कलिंगड 🍉गुंठ्या ला टनभर
पाटण तालुका हा अति पावसाचा तालुका असल्याने आणि जमीन लाल व हलकी प्रतीची त्यामुळे या भागात उसाचे जास्त उत्पादन मिळतं नाही जेमतेम गुंठ्याला टणं एवढा च ऊस उत्पादन मिळते..
परंतु काही शेतकरी आता आधुनिक पद्धतीने कलिंगड 🍉शेती करत आहेत त्यांची उत्पादकता गुंठ्यात 1टणा पर्यंत जातं आहेत म्हणजे तिनं महिन्यात सरासरी 8-10000 टणाला बाजारभाव कलिंगड ला मिळतं आहे.
सध्या पाटण तालुक्यात गोल कलिंगड ची क्रेज आहे हे कलिंगड अतिशय चविष्ट व साधारण पणे कलिंगडाचे 🍉वजन 6किलो पासून 12किलो पर्यंत मिळते. आईसबॉक्स कलिंगड पेक्षा 2-3रुपये जास्त बाजारभाव या कलिंगड ला मिळतो.
यावर्षी सुनील शिर्के अडुळ यांचा प्लॉट आज हार्वेस्टिंग झाला साधारण पणे एका कलिंगड चे वजन 10किलो आसपास आहे. यामध्येच मिरचीचे अतिरिक्त उत्पादन त्यांना मिळालं आहे. अतिशय कमी खर्चात एकाच मल्चिंग वर 3पिकाचे नियोजन त्यांनी ABP EXOTICA च्या मार्गदर्शनाखाली केले आहे. कलिंगड काढून त्याच जागेवर दोडक्याची लागवड ते करणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क -
ABP EXOTICA पाटण
फळाचे वजन 9.5किलो आहे
ReplyDelete