कशी घ्याल कलिंगड रोपांची काळजी
_नवे शेती पर्व... युवा शेतकरी सर्व_
*ABP EXOTICA PATAN* 🍉🍉
मित्रांनो आज आपण पहिल्या टप्प्यात कलिंगड रोपांची कशी काळजी घ्यायला हवी हे पाहणार आहोत . रोपांची लागण झाल्यानंतर काही दिवस रोपांना खूप जपावं लागतं. प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची आळवणी करतात.आज आपण आळवणी घेत असताना दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आळवणी घेनार आहोत पांढर्या मुळीची निकोप वाढ आणि बुरशीनाशकाची गरज असल्याने प्रथम स्पीकvandar vam व जिवाणू खते यांचं ड्रेंचिंग घेणार आहोत आणि नंतर बाविस्टिन या दोन औषधांची आळवणी आपण घेनार आहोत. याबरोबर पोटॅशीयम हुमेट वापर करावा. ही माहिती देत असताना आपण या दोन गोष्टींवर काम करणारी, चांगले रिझल्ट असणारी कोणतीही औषधे वापरू शकता.अमुक अमुक औषधेच वापरा असे काही नसते. अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी रिझल्ट असणारी कोणतीही औषधे वापरली तरी चालतील. फक्त कोणती आळवणी कशासाठी घ्यायची याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.
त्याचबरोबर चिकट सापळे लावणे गरजेचे आहे व फळमाशी ट्रॅप हे लावा .जवळपास एकर क्षेत्रासाठी 60चिकट सापळे व 10 फळमाशी सापळे लावा .थ्रिप्स व फळमाशीवर कंट्रोल मिळविण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन म्हणून हे सापळे खूप मोलाचे कार्य करत असतात.
प्रत्येक पिकाचे काही टप्पे असतात. लागवडी पूर्वी, लागवडी नंतरचा टप्पा अतिशय नियोजनबद्ध रितीने पार पाडावा लागतो.एकदा का पिकाला रूप आलं की परत सहसा आडचणी येत नाहीत.सुरूवातीचा टप्पा खूपच निर्णायक असतो.तो सुखरुप पार पडणं महत्वाचं.
अधिक माहिती साठी संपर्क साधा -
*ABP EXOTICA PATAN*
*9172623446*
Comments
Post a Comment