उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड फायद्याची
नमस्कार 🙏शेतकरी मित्रांनो. आज आपण कोथिंबीर पिकाविषयी माहिती घेणार आहोत. कोथिंबीर हे कमी कालावधीत येणार पीक आहे. काही भागात वर्षभर टप्पा पाडून याची लागवड केली जाते.
जमीन -भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, तसेच मध्यम ते भारी जमीन कोथिंबीर साठी योग्य आहे. पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
कोथिंबीर साठी चांगल्या प्रतिच्या बियाण्याचा वापर करावा. बियाणे फोडलेले असेल तर उत्तम. बियाणे लागवड करण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सावलीत सुकवावे. त्यावर जिवाणू खतांची बिजप्रक्रिया करून लागवड केल्यास उत्तम उगवण होते.
उन्हाळ्यात लागवड करताना मायक्रो स्प्रिंकलर चा वापर केल्यास चांगले उत्पादन मिळते व उगवन चांगली होते. लागवड शक्यतो सायंकाळी करून लगेच रात्री पाणी द्यावे. पाणी रात्री दिल्यास कोथिंबीर पिवळी पडत नाही.
बियाणे पेरून एकरी 40-50किलो लागते तर फोकून दिल्यास एकरी 60किलो बियाणे लागते.
🌸बियाणे पेरणी केल्यावर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी गोल हे तननाशक पंपाला 10ml या प्रमाणे घेऊन पेरणी नंतर पाणी दिल्यावर 48तासाच्या आत फवारणी करावी.
खतांचा वापर करताना बियाणे पेरतांना च खतं योग्य प्रमाणात द्यावी एकरी 2बॅग 24:24:0 व एक बॅग 9:24:24 आणि 10किलो ह्यूमिक द्यावे त्याबरोबर एकरी 10बॅग गांडूळ खतं द्यावे.
🌸उन्हाळ्यात क्रॉप कव्हर चा वापर केल्यास चांगल्या क्वालिटी ची कोथिंबीर मिळते
🌸उगवणी नंतर आवश्यकते नुसार 2फवारण्या घ्याव्या त्यामुळे पानांची साईज चांगली मिळते.
🌸1किलो बियांनापासून साधारणपने 125-150पेंडी कोथिंबीर मिळते.
Comments
Post a Comment