झूकिणी (SQUASH ) लावा. जास्त फायदा मिळवा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो.🙏🙏
आज आपण झूकिणी या EXOTIC फळभाजी ची माहिती घेणार आहोत. झूकिणी ची लागवड पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये भरपूर प्रकार आहेत. ग्रीन झूकिणी, येलो झूकिणी, LIGHT ग्रीन झूकिणी. असे विविध प्रकार आढळतात. त्यापैकी हिरवी व पिवळी झूकिणी ला जास्त मागणी आहे. झूकिणी चा वापर हा सलाड साठी व भाजी साठी केला जातो.
कमी कालावधीत लाखोंचा फायदा देणारे झूकिणी हे पीक आहे. परंतु याची लागवड कशा पद्धतीने किती प्रमाणात केली पाहिजे याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळते म्हणून काही शेतकरी मार्केट चा अभ्यास न करता मोठ्या प्रमाणात लागवड करतात. असे शेतकरी तोट्यात जाण्याची शक्यता असते. कारण मार्केट मधील मागणी आणि पुरवठा या गोष्टीचा अभ्यास करून याची लागवड करणे आवश्यक आहे.
झूकिणी ची लागवड टप्प्याटप्प्याने वर्षभर केल्यास चांगला फायदा मिळतो. साधारणपने दररोज 500किलो माल निघेल या बेताने लागवड केल्यास दररोज 10000-25000/-पर्यंत पट्टी मिळू शकते. कारण झूकीनीचा दर 20/-किलो पासून पुढे 100-150रुपये किलो पर्यंत मिळतो.
झूकिणी पीक थंडी मध्ये चांगले येते. परंतु वर्षभर लागवड करणे गरजेचे आहे. आणि योग्य नियोजन असेल तर तीनही हंगामात चांगले नियोजन केल्यास पीक छान येते. बियाणे लागवडीपासून 30-35दिवसात झूकिणी तोडा चालू होतो. पुढे एक ते दीड महिना तोडा चालू राहतो. एकरामध्ये साधारणपणे 15टणं झूकिणी मिळते.
झूकिणी वर पंढरीमाशी, थ्रीप्स, व व्हायरस याचा प्रादुर्भाव होतो. योग्य काळजी व फवारणी घेतल्यास किडीपासून संरक्षण होते.
Comments
Post a Comment