काकडी कडू किंवा कडवट का होते?
नमस्कार 🙏शेतकरी मित्रांनो. आज आपण काकडी ला कडवंटपणा का येतो किंवा काकडी कडू का होते या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो कधी कधी आपण लावलेली काकडी फळांना कडवट पणा येतो काकडी कडू होते अशा वेळी मार्केट मध्ये काकडी कोणी घेतं नाही. काकडी ला दर मिळतं नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. व योग्य काळजी घेतल्यास होणारे नुकसान टाळता येते. 🍁 काकडी कडवट होण्याची कारणे - काकडीच्या पानात, खोडात आणि काही प्रमाणात फळात देखील कुकुरबिटासीन हा नैसर्गिक घटक असतो. त्यामुळे मुळातच थोडा कडवट पणा काकडीत आलेला असतो. परंतु याचबरोबर अतिउष्णतापमान किंवा अति थंड तापमान असताना पिकावर स्ट्रेस येतो व फळं कडवट होतात.पीक फुलोरा व फळाच्या अवस्थेत असताना कोरडेपणा जास्त दिवस राहिल्यामुळे व पाण्याची कमतरता भासल्यामुळं फळांना कडवटपणा येतो. तसेच पिकावर ताण पडल्यास सुद्धा काकडी कडवट होते. उपाय - अतिउष्णतापमान असताना भरपूर प्रमाणात पाणी द्यावे व क्रॉप कव्हर चा उपयोग करावा. अतिथंड तापमान असताना हवेच्या दिशेला ज्या ब...